ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौडमध्ये बनावट देशी दारू विकणारी टोळी जेरबंद, पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

  • पुणेरी टाइम्स टीम…
    (आलिम सय्यद)

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी गावच्या हद्दीत बनावट देशी दारूची विक्री करणाऱ्या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये बेकायदा बनावट देशी दारूचे २० बॉक्स सह एक दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त केली असून तब्बल पावणेआठ लाखाचे माल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुरकुंभ व पांढरेवाडी हद्दीत दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून बनावट देशी दारूची वाहतुक व विक्री होत असताना २० बॉक्स बनावट देशी दारू, एक चारचाकी व एक दुचाकी वाहनासह एकूण रू.७ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सोनू विसराम फलोशिया (वय २२ रा. रामनगर, बोपखेल, ता. हवेली, जि. पुणे, शहारूख दाऊद सय्यद (वय २६, दौंड), अभिजीत धनंजय लोणकर (वय ३० रा. पासलकरवस्ती, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून अनिकेत प्रकाश भोसले (वय २६ वर्षे रा. शालिमार चौक दौंड, ता. दौंड, जि. पुणे) हा फरार झालेला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण पुणे विभागाचे आयुक्त मोहन वर्धे, पुणे जिल्ह्याचे अधिक्षक चरणसिंग राजपुत, उपअधिक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे पोलीस निरीक्षक अशोक शितोळे, दुय्यम पोलीस निरीक्षक नेवसे, सुभाष मांजरे, भोसले, सहायक , दुय्यम निरीक्षक दत्ता गवारी व किशन पावडे, अशोक पाटील, गणेश वाबळे, प्रविण चव्हाण, अक्षय म्हेत्रे, सागर दुबळे, कोळपे, नवनाथ पडवळ, रोहित शिंदे (होमगार्ड) आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक विजय रोकडे करीत आहेत.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]