पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील राजकारणात कुल थोरात हे दोन तुल्यबळ गट कायम आमनेसामने भिडलेले आपण कायम पाहत असतो. मात्र नुकतेच भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्याच दिवशी आमदार राहुल कुल व त्यांच्या कारखाना प्रशासना विरोधात माजी आमदार रमेश थोरात यांनी कारखाना स्थळावर निषेध मोर्चा काढला होता. तर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आरोप प्रत्यारोपासह गदारोळही झाला होता. त्यामुळे तालुक्यातील वातावरण भलतेच तापलेले असताना काल राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या निवडणुका जाहीर केल्याने दौंड तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे केडगाव ग्रामपंचायतीसह पारगाव, खोपोडी, नायगाव, वाटलुज, मलठण, पांढरेवाडी, कुरकुंभ, वाखारी, पानवली,वडगाव बांडे या गावात निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी कुल थोरात कार्यकर्ते आमने-सामने लढणार आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण तुल्यबळ ठरणार हे पाणी महत्त्वाचे आहे…