पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)
कोतवाल संवर्गातील पदासाठी सरळ सेवाभरती जाहीर झाली असून दौंड तालुक्यातील १४ गावांचा यामध्ये समावेश आहे. याबाबतची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी, देऊळगाव राजे, नांदूर, बोरीपार्धी, खामगाव, गिरीम, दापोडी, पिंपळगाव, दहिटणे,बोरीबेल, दौंड, पाटस, केडगांव, पारगांव या चौदा सजांचे प्रवर्गानुसार कोतवालाची नेमणुक केली जाणार आहे. याबाबतचा जाहीरनामा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी दौंड यांनी जाहीरनाम्याद्वारे प्रसिद्ध केला आहे.
तरी ज्या व्यक्तीस कोतवाल म्हणुन काम करणेची इच्छा आहे, त्यांनी तहसिलदार दौंड यांचे कार्यालयात दि. २९/०९/२०२३ ते दि. १०/१०/२०२३ पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत (शासकीय सुट्टया बगळून) समक्ष पोहोच होईल, अशा रितीने विहीत नमुन्यामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.
कोतवाल पदनियुक्तीसाठीचे सजांचे नाव व जात प्रवर्गाचे आरक्षण खालीलप्रमाणे –
हिंगणीबेर्डी – अनुसूचित जमाती
देऊळगांव राजे – अनुसूचित जमाती (महिला)
नांदूर – भटक्या जमाती (ब)
बोरीपार्थी – भटक्या जमाती (क)
खामगांव – भटक्या जमाती (ड)
गिरीम – विशेष मागास प्रवर्ग
दापोडी – इतर मागास प्रवर्ग
पिंपळगांव – इतर मागास प्रवर्ग
दहिटणे – इतर मागास प्रवर्ग
बोरीबेल – इतर मागास प्रवर्ग
दौंड – इतर मागास प्रवर्ग (महिला)
पाटस – इतर मागास प्रवर्ग (महिला)
केडगांव – अर्थिक दृष्टया दुर्बल (EWS)
पारगांव – अर्थिक दृष्टया दुर्बल (EWS) महिला