ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

भिमा पाटसची सर्वसाधारण सभा ‘गडबड गोंधळातच’ राष्ट्रगीताचा अवमान भिमा पाटसच्या सभासदांना न सहन होणारा…

पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील वरदान ठरणारा भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या आज ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना स्थळावर संपन्न झाली आहे.
आज या सभेत दिवंगत नेते, सैनिक, आणि हरित क्रांतीचे प्रणेते एस. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करून विषय पत्रिकेतील विषयावर चर्चा करुन सभा संपन्न झाली आहे.

उस दराबाबतची कोंडी मात्र यावेळीही फुटली नाही मात्र अध्यक्ष कुल यांनी उस दराबाबत प्रश्नी उत्तर देताना इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव देवू असे सांगितले.

कारखान्याच्या मिटिंगमध्ये हजारो शेतकरी सभासद उपस्थित होते, समोर मात्र चाळीस पन्नास लोकांच्या मध्ये सभा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे, आम्ही बसलो तरी तेवढे लोकं जमा होतात, समोरच्याच्या आरोपांना जास्त महत्त्व देत नाही असे कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव न घेता टिका केली आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शितोळे यांचा फोटो न छापल्याबदद्ल कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना पत्रकार
परिषदेत विचारले असता हे मागील मागील चार वर्षांपुर्वी सुचवले असते तर बरे झाले असते. आम्ही त्याच वेळी सुधारणा केली असते. चार वर्षे यांना यांचा संदर्भच लागला नाही आता यांना कुठलीही तक्रार करायला वाव नसल्याने त्यांनी हा विषय शोधून लोकांसमोर मांडलेला आहे. लोकांचा त्यांना कुठलाही प्रतिसाद नाही, तुम्हीही त्यांना गंभीर घेवू नका असे कुल पत्रकारांना बोलताना म्हणाले.चार वर्षानंतर हा विषय शोधून काढला आहे, चार वर्षांपासून पासून अहवालामध्ये कोणाचाच फोटो छापला जात नाही, हे यांना उशीरा समजलेलं आहे असेही कुल यावेळी म्हणाले…

ऐनवेळीचे विषयांचे ठराव मांडत असताना सभा सुरळीत चालू असताना काही सभासद कार्यकर्त्यांनी अध्यक्षांच्या परवानगी आधीच राष्ट्रगीत सुरू करुन सभा संपवली…व संचालक मंडळाने हे मान्य करीत सभा संपवल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. राष्ट्रगीताचा अवमान होणे हे या राष्ट्राच्या संस्कृतीमध्ये न बसणारे आहे. राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत कारखान्याचे जाणते सभासद यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे अशा सभासद कार्यकर्त्यांना संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांनी आवर घातला पाहिजे अशीही चर्चा सभा संपल्यानंतर सभासदांमध्ये होत होती…

आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कारखाना परिसरात तालुक्यातील राजकारण्यांचा मेळा भरला होता. तर काही काळ वातावरणही तापले होते.

यावेळी पांडुरंग मेरगळ, शिवाजी नांदखिले, वैशाली नागवडे, आत्माराम (पोपटभाई) ताकवणे, हरिदास लाळगे, बापूराव भागवत, वसंत साळुंके, हनुमंत शितोळे, विठ्ठल दोरगे, आदी उपस्थित होते.

तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या निषेध सभेमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्यावर रमेश थोरात यांनी जोरदार टीका केली आहे. कारखाना प्रशासनाचे नियोजन, 70 हजार पोती साखर जळाल्याचे खोटं कटकारस्थान, कुल यांचे वैयक्तिक खासगी कॉलेज, सुभाष अण्णा दूध संघ, यास राहूच्या विकास सोसायटीवरही टिका करण्याची संधी थोरात यांनी सोडली नाही. तर वडिलांच्या नावाने सुरू केलेल्या दूध संघातही वीज चोरी पकडली गेली आहे त्याचा गुन्हाही यवत पोलिसांत दाखल आहे असे थोरात त्यांनी यावेळी सांगितले.

दौंड मधील राजकारण विचारात घेता आणि कारखाना स्थळी असलेली निषेध सभा व सर्वसाधारण सभा विचारात घेता येथील वातावरण तापलेले होते. याचीच दखल घेत पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे या अधिकार्यासह मोठा पोलिस बंदोबस्त कारखाना स्थळावर तैनात करण्यात आला होता.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]