पुणेरी टाइम्स टीम…
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्याबाबत सर्व नगरपरिषदांना केंद्र शासनातर्फे निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरून स्वच्छता मोहीम, स्वच्छता संदेश रॅली, विविध स्पर्धा यांच्या आयोजन नगर परिषदेतर्फे करण्यात आलेले आहे. स्वच्छता पंधरवडा साजरा करत असताना आज दौंड नगरपरिषदेने रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत संस्कार प्रायमरी स्कूल, शिशू विकास विद्यामंदिर, विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय,न्यू इंग्लिश स्कूल, दौंड या शाळेतील विद्यार्थी तसेच मोठ्या गटात दौंड शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. रांगोळी स्पर्धेत सर्व विषयांवर आधारित रांगोळी काढण्यात आल्या. दौंड नगर परिषदेतर्फे उपमुख्यअधिकारी सुप्रिया गुरव, नोडल अधिकारी तृप्ती साळुंखे, सुजाता खाडे, स्मिता म्हस्के, हनुमंत गुंड, शाहू महाराज पाटील, दीपक म्हस्के,विजय नाळे,शुभम चौकटे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यअधिकारी डॉ. संतोष टेंगले यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेत 43 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रांगोळी स्पर्धेचा निकाल दोन गटात देण्यात आला आहे.
यामध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक सुनील लालासो नेटके, द्वितीय क्रमांक मधू कांबळे , तृतीय क्रमांक नेहा कांबळे तर लहान गटात प्रथम क्रमांक संस्कार प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी क्षिरसागर, द्वितीय क्रमांक शिशू विकास विद्यामंदिराचे विद्यार्थी कृष्णा मंगेश गोलांडे, तृतीय क्रमांक वेदांत किशोर रिकीबे, उत्तेजनार्थ क्रमांक प्राची भोसले आणि वैभव प्रभू रोडगे यांनी यश मिळवले आहे,