पुणेरी टाइम्स टीम
सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात – विविध उपक्रमांव्दारे साजरा होतांना दिसत आहे . मात्र जाती – धर्माचे मतभेद बाजुला ठेवत एकात्मतेच्या संदेशाचे पालन करत दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे राहुल दादा कुल मिञ मंडळ या गणेश मंडळाने विविध जाती धर्माचा एकोपा जोपासत पांढरेवाडी गावातील सय्यद वस्ती येथिल मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणेशमुर्तीची आरती करुन पंचक्रोशितील जनतेला सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे .
पांढरेवाडी गावठाण येथील राहुल दादा कुल मित्र मंडळ या गणपती बाप्पाची आरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते पार पडली . श्री गणेशाच्या आरतीचा मान मुस्लिम बांधवांना देऊन राज्यातील हिंदू – मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन दौंडच्या पांढरेवाडी गावात घडले आहे. यावेळी रशीद सय्यद, भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन इस्माईल सय्यद, नजीर सय्यद, पत्रकार आलिम सय्यद, सागर जाधव, अतुल कोंडे, सचिन जाधव राहुल दादा कुल मित्र मंडळाचे अध्यक्ष तुषार भागवत, रोहित भागवत, तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठळक बातम्या
जुन्या काळातील यशस्वी बांधकाम व्यावसायिक, हिगणीगाडा गावचे माजी सरपंच ‘बोबडे नाना’ यांचे अपघाती निधन…भक्तीमार्गावर वासुंदे येथे भीषण अपघात, पाटस येथील महिला तर चिंचणी येथील युवकाचा मृत्यू…कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?