पुणेरी टाइम्स टीम…
आयुष्यमान भवः कार्यक्रमाअतर्गत दौंड तालुक्यातील ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे ८ व प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य पथक १ व नागरी आरोग्य केंद्र १ अशा सर्व ठिकाणी आज दिनांक २३/९/२०२३ रोजी असांसर्गिक आजारांचे शिबीर आयोजन करुन यामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, क्षयरोग तपासणी, कर्करोग तपासणी व असांसर्गिक आजारामधील इतर तपासण्या करण्यात आल्या व औषधोपचार करण्यात आले. तसचे 537 आभाकार्ड, 51आयुष्यमान गोल्डनकार्ड, आरोग्य शिक्षण देणे याबाबत सदर शिबीरामध्ये माहिती देण्यात आली. सदर शिबीरामध्ये २२०४ लाभार्थीची तपासणी करण्यात आली अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी पं.स.दौंड आरोग्य विभाग डॉ. उज्वला जाधव यांनी दिली.