पुणेरी टाइम्स टीम
दौंड तालुक्यातील वासुंदे येथील बेकायदेशीर दारु विक्री मुळे गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत, आक्रमक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दारु विक्रेत्यांच्या दारुच्या बाटल्या घेवून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत दारुच्या बाटल्यांची वासुंदे ग्रामपंचायत कार्यालयासमोर होळी केली आहे. सदर महिलांना बेकायदेशीर दारु विक्रेत्यांनी महिलांना धक्काबुक्की केली असल्याचे महिलांनी सांगितले आहे.
यावेळी आक्रमक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळेतोडुन कार्यालयास आग लावण्याचा इशारा दिला होता. मात्र दौंड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तातडीने पोलीस पाठवून सदर माल जप्त करूत दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, तदनंतर स्थानिक महिलांकडून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले…
