ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणेरी टाइम्स टीम
पुणे, दि. १८: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी, मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कार’ देण्यात येणार असून यामध्ये महाविद्यालयांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुण मतदाराला देशाच्या, राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्याची मतदार यादीत नोंद आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केल्यास राज्यातील अठरा वर्षांवरील सर्व तरुण पिढीला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य होईल. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मतदार यादीत आगाऊ नोंदणी करण्याची संधी आहे. या कामात महाविद्यालये चांगल्याप्रकारे भूमिका बजाऊ शकतात.

या पुरस्कार योजनेत भाग घेण्यासाठी गुगल अर्जाचा दुवा https://forms.gle/62YsA6SA3ngZn4UaA वर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत आवश्यक माहिती भरावयाची आहे. यामध्ये महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या, १ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, मतदार जागृतीसाठी महाविद्यालयाने राबवलेले उपक्रम तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत मतदार जागृतीसाठी राबवलेले उपक्रम याची माहिती भरावयाची आहे.

महाविद्यालयांनी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाचे सहकार्य घेऊन मतदार नोंदणीची शिबिरे राबवावीत किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाइल अॅपवरून अथवा वोटर सर्व्हिस पोर्टल वरून विद्यार्थ्याची ऑनलाइन: मतदार नोंदणी करून घ्यावी.

या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०२४ रोजी केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांतर्गत सहा महाविद्यालयाची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी democracybook2022@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo या संकेतस्थळावर डाऊनलोड्स- स्वीप सर्क्युलर या दुव्याखाली परिपत्रक उपलब्ध करुन देण्यात आले आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]