ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंडच्या क्रीडा संकुलात होणार ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस व बास्केटबॉल चे मैदान, क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न…

पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक नुकतीच दौंड येथे पार पडली. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दौंड क्रीडा संकुल व नाट्यगृहासाठी कृषी विभागाकडील बीजगुणन केंद्राची १० एकर जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करून घेण्यात आपल्याला यश आल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.
जागेचा प्रश्न सोडवणून या संकुलासाठी सुमारे ९.५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली असून पैकी संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी सुमारे १ कोटी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून संरक्षण भिंतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
पुढील टप्यामध्ये क्रीडा संकुलाच्या जागेचे समतलीकरण करणे, ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक, कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस व बास्केटबॉल आदी खेळांसाठी आवश्य मैदाने व सुविधा तयार करण्याचे नियोजन असून त्यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. यावेळी सदर अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामाला सुरुवात करता यावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, मैदानाचा आराखडा करताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, खेळाडूंना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस तहसीलदार तथा समितीचे कार्याध्यक्ष श्री. अरुण शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी श्री. महेश चावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहय्यक अभियंता (श्रेणी – १) श्री. मयूर सोनवणे, गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे, महावितरणचे उपभियंता श्री. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय महाजन आदी उपस्थित होते.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]