पुणेरी टाइम्स टीम
राजगुरुनगर नगरपरिषद ता. खेड जि. पुणे येथील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीमती चारुबला राजेंद्र हरडे वय 31वर्ष, पद – अभियंता आरोग्य विभाग (वर्ग-३), प्रवीण गणपत कापसे वय 35 वर्ष ,पद – लेखापाल (वर्ग – 3) श्रीकांत अण्णासाहेब लाळगे वय 35 वर्ष ,पद- मुख्याधिकारी ,( वर्ग 2) सर्व राजगुरू नगरपरिषद,खेड ,पुणे यांनी तक्रारदार यांना 8000/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदर रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. सदरचा सापळा दिनांक 13/09/2023 रोजी राजगुरू नगरपरिषद, खेड पुणे येथील कार्यालयामध्ये लावण्यात आला होता.
याबाबत हकीकत अशी की,यातील तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून, त्यांना राजगुरू नगरपरिषद,खेड पुणे,येथील आरोग्य विभाग या करिता लागणारे साहित्य पुरवले होते .त्याचे एकूण 80730 रुपयाचे बिल त्यांनी नगरपरिषद राजगुरुनगर येथे सादर केले होते. नमूद बिल काढून देण्याकरिता लोकसेवक श्रीमती हरडे यांनी 8000/- रुपयांची लाचेची मागणी पंचासमक्ष करुन, 8000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर रंगेहाथ पकडण्यात आले व लोकसेवक प्रवीण कापसे आणि लोकसेवक श्रीकांत लाळगें यांनी लोकसेवक श्रीमती हरडे यांना सदर लाच स्विकरण्याकरिता प्रोत्साहन दिल्याने खेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध 1988 अधिनियम कलम 7,12 खाली गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील दोन आरोपी यांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक नितीन जाधव यांनी दिली आहे.
सदरची कामगिरी डॉ. शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, नितिन जाधव, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक – श्री. प्रविण निंबाळकर,पोलिस निरीक्षक रुपेश जाधव, शिल्पा तुपे, आशिष डावकर, चालक माळी, यांनी केली आहे.
यावेळी सर्व नागरिकांना आपणांस कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ . शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे (मोबाईल क्रमांक 9921810357), तसेच नितिन जाधव, पोलीस उप अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
मोबाईल क्र. 9923046855
कार्यालय क्र. 020 26132802
ईमेल-dyspacbpune@gmail.com टोल फ्री नंबर 1064 यावरती संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.