ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

दौंड मध्ये सदाभाऊ खोत यांची राज्यातील नेत्यांवर सडकून टीका, ढवळ्या पवळ्याचं काम बंद करा, मराठा ओबीसी यांच्यामध्ये

पुणेरी टाइम्स टीम…
दौंड येथे मागील काळातील आंदोलन प्रसंगी दाखल झालेल्या गुन्ह्यातील कामकाजाच्या निमित्ताने दौंड न्यायालयात ता.११ रोजी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आले होते. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहामध्ये खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील नेत्यांनी मराठा आरक्षणामध्ये ढवळाढवळ करू नये असे मत व्यक्त केले आहे. यावेळी खोत यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील नेत्यांचा समाचार घेतला आहे. यावेळी खोत म्हणाले की, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना काही काम नाही, कोणताही नेता शेतात आऊत धरायला जात नाही, ऊसाला पाणी द्यायला जात नाही, मराठा ओबीसी यांच्यामध्ये वाद अजिबात नाही. खरा वाद आहे सत्तेमध्ये वाटा मिळवणाऱ्या मध्ये आहे. हाच खरा वाद आहे. जनतेला खेळवायचे धंदे चालू आहेत मी महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगेन आता हे ढवळ्या पवळ्याचं काम जरा बंद करा. आता तुम्ही घरात बसा अक्कल लय पाजळायच्या नादाला आता लागू नका. गावात ओबीसी गुण्यागोविंदाने आहेत. आपले राजकारण जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सोयीने बैठका घ्यायचे, मेळावे घ्यायचे हे बंद करा. महाराष्ट्रातील नेत्यांनी शहाणपणा घ्यावा पोरकटपणा सोडून द्यावा. खुळ्याचा धंदा की, वेडं बनवायचे काम महाराष्ट्रातील नेत्यांनी जनतेला केलेले आहे. सगळ्याच नेत्यांनी हे धंदे बंद करा, मताच्या वेळी या की जोगवा मागायला आत्ता कशाला बोंबाबोंब करायला लागला आहे असे मत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे…

Leave a Comment

[adsforwp id="47"]