ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही दौंड च्या ‘या’भागात पाण्यासाठी वणवण सुरुच, पिके जळू लागली.‌…..

पुणेरी टाइम्स टीम

पुणे जिल्ह्यातील पूर्व भागातील पुरंदर,दौंड, बारामती, इंदापूर, तालुक्यातील कित्येक क्षेत्र हे आजही आवर्षण प्रवर्षण क्षेत्रामध्ये येत असून, शासनाने हजारो कोटी सिंचनासाठी खर्च केले आहेत. मात्र येथील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मूलभूत सुविधांमधील महत्त्वाचा घटक असलेले पाणी येथील शेतीला मिळत नसल्याने, येथील शेतकरी पिंजलेला आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही हेच येथील लोकप्रतिनिधींचे दुर्दैव असून त्यांची निष्क्रियता असल्याचे बोलले जात आहे.

दौंड तालुक्यातील जिरायत भागाबाबत तर जानाई शिरसाई योजनेतील अपूर्ण कामे, प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव येथील शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे. कित्येक वर्ष येथील जनता पाण्यापासून वंचित राहिली आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळी येतात आणि फक्त आश्वासनाचा मोठा पाऊस पाडून जातात. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मनावर मात्र फक्त आश्वासनांचा मारा होतो.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बाजरीचे पीक पुर्णपणे वाया गेले आहे, अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे जिल्ह्यातील पुर्व भागातील दौंड, बारामती च्या जिरायत भागातील शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. पाण्यासोबत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शासनाने दुष्काळ जाहीर करुन मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]