पुणेरी टाइम्स टीम…
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई आणि मुलीचा वाद शिगेला गेला असून यामध्ये मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की शाळेत वाद झाला म्हणून आईचं आणि मुलीचे भांडण झालं. रागारागाने मुलगी घराबाहेर निघाली, म्हणून आईने तिला घरात ओढून बेडरूममध्ये बसवलं, बेडवर बसवल्यानंतर मुलीने आईला दिला धक्का आणि मग चिडून जाऊन आईने मुलीला एवढी मारहाण केली की व गळा दाबला यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे .ही घटना दौंड शहरात घडली आहे . मग या घडलेल्या घटनेप्रकरणी नवऱ्यानेच बायकोविरोधात दौंड पोलिसांत फिर्याद दिली आहे
आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हरीओम शामप्रसाद जागिंड (वय-44 वर्षे व्यवसाय नोकरी रा-डिफेन्स कॉलणी रेल्वे कॉर्टर आर. बी-2 रुम नं-407D दौंड, मुळ रा-गणपत विहार तिजारा फाटक अलवर, राज्य राजस्थान) यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सरिता हरिओम जागिंड हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना सहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जागिंड कुटुंबाच्या घरात घडली.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी हरिओम जागींड हे पत्नी सरिता हिच्यासह दीक्षा, विजयलक्ष्मी, पायल आणि अनु या चार मुलींसोबत दौंड शहरात राहण्यास असून हरीओम हे रेल्वेमध्ये पॉईंट्स मॅन म्हणून नोकरी करतात. सहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सरिता व दीक्षा यांच्यामध्ये शाळेतील घटनेवरून वाद झाला या वादात सरिता हिने दीक्षा हिला बोलल्यानंतर दीक्षा रागारागाने घरातून बाहेर निघाली, तेव्हा सरिता हिने तिला घरात ओढून बेडवर बसवले. दीक्षा हिला मारहाण केल्यानंतर दीक्षा हिने सरिता हिला धक्का दिला. त्यामुळे चिडून जाऊन सरिता हिने दीक्षा हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व गळा दाबला. यात दीक्षा हीचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास फौजदार राऊत करत आहेत.