ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

गौणखनिज धोरणास माफियांनी दाखविला “कात्रजचा घाट” महसूल प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट भूमिका…

 पुणेरी टाइम्स टीम…

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा कर म्हणून महसूल कर ओळखला जातो. मात्र हा कर दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील माफिया कोट्यवधी रुपयांनी बुडवत असताना महसूल प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे. नुकतीच बारामती टिपर वाहतूक संघटनेने खाण माफीया विरोधात लेखी तक्रारही केली आहे. तरीही कुठेही कारवाई होत नाही त्यामुळे कुंपणच शेत खाते की काय असा सवाल निर्माण होत आहे.

दौंड तालुक्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, पांढरेवाडी, देऊळगाव गाडा, भांडगाव, पडवी परिसरात मोठ्या प्रमाणात खडी क्रशर आहेत, तर बारामती मध्ये मुर्टी, पणदरे, वढाणे, इंदापूर मध्ये लाकडी, शेटफळ, म्हसोबाची वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात खाण व्यवसाय आहेत. 

येथील खाणी व स्टोन क्रेशर च्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा अंदाज आहे. येथील खाण माफियांनी शासकीय ठेकेदारांशी संगणमत करून सरकारी कामांमध्ये देय असणारी गौण खनिज महसूल (रॉयल्टी) स्वरूपातील महसूल आपल्या क्रशरच्या नावे दाखवून शासकीय ठेकेदारांना पाहिजे तशी चलने दिल्याच्या घटना घडल्या आहेत.

शासकीय विकास कामे होत असताना त्या कामासाठी उत्खनन हे त्याच परिसरात होत असते, मात्र त्याची रॉयल्टी या खाण उद्योगाच्या माध्यमातून दाखवून कोट्यावधी रुपयाचा अपहार खाण मालक व शासकीय ठेकेदार यांनी खनिकर्म अधिकारी यांच्या संगणमताने केला आहे. यातून शासनाची हजारो कोटीची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही‌. 

याची कायदेशीर चौकशी होणे गरजेचे आहे, राज्यात महसूल स्वरूपात जास्तीचा कर जमा व्हावा यासाठी महसूल मंत्री वारंवार प्रयत्न करित असून, त्यासाठी नवीन गौणखनिज धोरण अवलंबिले आहे. मात्र त्यासही या खाणमाफीयांनी कात्रजचा घाट दाखवून आपली पोळी भाजून सुकाळ आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

 त्यामुळे येथील खान माफिया, महसूल प्रशासन, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याबाबत आगामी काळात, मा. विभागीय आयुक्त सो, मा मुख्य सचिव सो.(महसुल) मा.महसूल मंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]