ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

बारामतीचे प्रांत, तहसीलदार, दौंडचे तहसीलदार यांची निष्क्रियता ‘चव्हाट्यावर’ नवीन गौण खनिज धोरणाचे तीनतेरा

पुणेरी टाइम्स टीम…

बारामती सह दौंड, इंदापूर मधून खाण माफिया कोट्यावधीचा महसूल बुडवीत आहेत, मात्र महसूल प्रशासन मुक गिळुन गप्पं बसण्याच्या भुमिकेवर ठाम आहे, नवीन गौण खनिज धोरणाचा अवलंब करणे, ऑनलाईन वाहतुक परवाना देणे, हे खाण माफियांवरती बंधनकारक असताना माफीया मात्र यास केराची टोपली दाखवत आहेत. बारामती मधील गौण खनिज वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेत उपविभागीय अधिकारी बारामती, तसेच तहसीलदार बारामती व तहसीलदार दौंड यांना लेखी निवेदन दिले आहे. मात्र अजूनही महसूल प्रशासनाने खाण माफीयांना पाठीशी घालण्याचा खेळ सुरूच ठेवला आहे. अद्याप कोणतीही मोठी कारवाई झाली नाही त्यामुळे जिल्हा खनिकर्म, अधिकारी उपविभागीय अधिकारी, बारामती तहसीलदार बारामती, तहसीलदार दौंड यांची निष्क्रियता दिसून येत आहे. तसेच महसूलचे बडे अधिकारी आणि खाणमालक यांच्यामध्ये मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे, माफियांकडून असे सांगण्यात येत आहे की शासकीय अधिकाऱ्यांना नियमित हप्ते चालू आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने नवीन गौण खनिज वाहतुकीचे धोरण अवलंबले असून या धोरणास महसूल प्रशासनाने हरताळ फासल्याचे बारामती टिपर वाहतूक संघटना यांचे म्हणणे आहे. बारामती टिपर वाहतूक संघटनेने केलेल्या तक्रारीवरून तरी गेंड्याची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेतलेल्या निर्भीड महसूल प्रशासनास जाग येणार का? महसूल प्रशासनाच्या अशा वागण्याने महसूल मंत्र्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे‌. त्यामुळे महसूल प्रशासन काय भुमिका घेणार हे पहाणे गरजेचे आहे.

सदर तक्रारीबाबत महसूल प्रशासनाने दखल न घेतल्यास उपोषणही करण्याचा इशारा बारामती टिपर वाहतूक संघटनेने दिला आहे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी बारामती तहसीलदार बारामती तहसीलदार दौंड यांना देण्यात आले आहे…

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]