- पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील वासुंदे येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट नंबर ७९ मधील पुरातन विहिरीमध्ये चिमणीच्या पिल्लांना आपले भक्ष बनवण्याच्या नादात नागाला तब्बल ४५ फूट खोल विहीर पडावे लागले, तदनंतर स्थानिक ग्रामस्थ यांच्या संपर्काने ग्रीनवल्ड फाउंडेशन चे सर्पमित्र सोन्या भागवत यांनी रेस्क्यू करित नागाला बाहेर काढण्यात यश मिळवले. - तदनंतर पकडलेल्या नागाला वनविभागाच्या हद्दीतील जागेत सोडून देत जीवदान दिले…
