पुणेरी टाइम्स टीम –
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात बसलेल्या आंदोलन त्यांना पोलीस प्रशासनाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका यांच्या वतीने आज दौंड मध्ये निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.
जालना येथे मराठा समाजातील आंदोलकानावर जो अमानुषपणे पोलिसांनी लाठी चार्ज केला, व त्यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांना देखील अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ आज दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव व नायब तहसीलदार शरद भोंग यांना देण्यात आले.