ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंड बारामती सह परिसरात कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराचे अनुदानासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी.

पुणेरी टाइम्स – दौंड
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका व शेजारील तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शेतशिवारातील पिके करपली असून नदी,नाले,तलाव कोरडे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे सरासरीपेक्षा कमी प्रमाणामध्ये पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी कमालीची घटलेली आहे.
त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुक्याच्या वतीने करण्यात आहे.याबाबत माहिती अशी की, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी दिली.

दौंड तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सध्या शेतकरी हवालदिल आहे. दौंड तालुक्यामध्ये शेतीपुरक अनेक व्यवसाय चालतात. यामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पण पाऊसाअभावी जनावरांना चारा टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे. पावसाच्या आशेने सुरुवातीला कमी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु पाऊस वेळेवर न पडल्यामुळे कर्जबाजारी होऊन बी बियाणे, खते खरेदी करून आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुबार पेरणीचे संकट आले आहे.

वरील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार नरेंद्र शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, शेतकरी अध्यक्ष विशाल राजवडे, खजिनदार प्रकाश तरटे, विद्यार्थी अध्यक्ष समीर लोहकरे, शेतकरी उपाध्यक्ष विकास टेमगिरे, युवक प्रसिद्धीप्रमुख गणेश दिवेकर, युवक उपाध्यक्ष प्रशांत ताडगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]