पुणेरी टाइम्स – मुंबई मंत्रालय
| वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या प्रश्नसंदर्भात ते लढत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मंत्री आणि त्यांचे अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. बगलबच्चे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतात. म्हणून शेतकऱ्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो. मंत्रालयामध्ये स्वतःचं घराणं सरकार ऐकून घेत नाही म्हणून धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. सरकार गांभीर्याने घेत नाही आणि माणसं मारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतं की काय हेच दिसते. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही.
50 खोके एकदम OK मध्ये जगणारं सरकार सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे व मजुरांचे प्रश्न जाणून घेत नाही. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत. संभाजी ब्रिगेड त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा…
– संतोष शिंदे,
प्रवक्ता तथा प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र