पुणे टाइम्स – दौंड
बहुचर्चित असणाऱ्या संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात असून अनेक ठिकाणी हे काम पूर्णत्वास गेले आहे. प्रशस्त असणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहनांना गती मिळत आहे. मात्र हीच गती अनेकांसाठी जीवघेणी ठरत आहे. या महामार्गावर अपघात घडण्याचे सत्र सुरूच आहे.
लाळगेवाडी येथील युवक राजेंद्र सुभाष लाळगे वय ४५ वर्षे यांच्या दुचाकीस दिनांक रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी याच महामार्गावर वासुंदे हद्दीत अपघात झाला होता . या अपघात लाळगे हे गंभीर जखमी झाले होते. जखमी राजेंद्र लाळगे यांना उपचारासाठी पाटस येथे व पुढील उपचारासाठी बारामतीतील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दिनांक २३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे.
राजेंद्र लाळगे यांची कन्या प्राजक्ता हिचा आज २६ ऑगस्ट रोजी विवाह होता. घरी लगीनघाई सजत असताना राजेंद्र यांचा अपघात होऊन अपघाती मृत्यू होणं संपूर्ण गावासाठी धक्कादायक व शौकदायक आहे, सदर घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे...
मृत राजेंद्र लाळगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे...