पुणेरी टाइम्स दौंड
दौडमध्ये पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नातीला पती डॉ. सदानंद गायकवाड यांच्याकडून अमानुष मारहाण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पद्मश्री दादासाहेब गायकवाड हे सहकारी होते, यांची नात डॉ. भावना गायकवाड (धुमाळ) यांना बेदम मारहाण करणारे त्यांचे पती डॉ. सदानंद धुमाळ व त्यांची सासू व दिर यांच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशनला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. भावना गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात व डॉ धुमाळ यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे सर्व प्रकरणात सोमवारी (२१ ऑगस्ट रोजी ) दौंड मधील दलित संघटनांकडून भीम जनआक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे दौंड पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
डॉ. भावना धुमाळ यांची तक्रार घेण्यास अकरा तास विलंब केल्याने दौंड पोलीस स्टेशन मधील संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील डॉ. सदानंद धुमाळ याला सहकार्य करणार्यांवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. डॉ. सदानंद धुमाळ यांना त्वरित अटक करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.