पुणेरी टाइम्स – आलिम सय्यद, कुरकुंभ
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आज पुन्हा केमिकल गलती झाल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील युके इंटरमीडिएट्स या केमिकल कंपनीमध्ये असणाऱ्या केमिकलच्या ड्रम मधून केमिकल गळती झाल्याची घटना आज घडली आहे. ही केमिकल गळती सुरू झाल्याने परिसरात अचानक धुराचे लोट सुरू झाल्याने या औद्योगिक वसाहती मधील परिसरातील कंपन्या मध्ये काम करणाऱ्या कामगारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु सदरची कंपनी ही अनेक दिवसांपासून बंद असल्याचं बोललं जातंय मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनीच्या गेट च्या बाजूला असणाऱ्या शेड मध्ये थायलिन क्लोराईड चे तेरा ड्रम (बॅरल) ला गळती झाल्याने अचानक परिसरात धुरच धूर पसरला होता सदरचा धूर जास्त प्रमाणात असल्याने या औद्योगिक वसाहत मध्ये खळबळ निर्माण होती. कंपनीला आग लागली अशा अफवा पसरु लागल्या होत्या.काही महिन्यांपूर्वी औद्योगिक वसाहती एका कंपनीला आग लागली होती. त्यावेळी गावातील नागरिक काही किलोमीटर लांब जाऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले होते. तशी अवस्था तर आता नाही ना अशी परिस्तिथी आज झाल्याचं येथील कामगारांमधून बोललं जातं आहे .
कुरकुंभ औद्योगिक अग्निशमन दलाचे एक बंब यांच्या सहाय्याने सदरचे आग व धूर आटोक्यात आणण्याचे काम केले. तसेच थायनिल क्लोराईड चा प्रभाव कमी करण्यासाठी अल्काइल अमाईन्स मधील सुरक्षा विभागा कडून साहित्याची मदत झाली.