ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंडच्या तालुका कृषीअधिकारीं साहेबांनी कृषिमंत्र्यांच्या आदेशाला दाखवला कात्रजचा घाट, दौंड मध्ये प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा बोजवारा

पुणेरी टाइम्स-

दौंड
कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी विषेश मोहीम राबवून प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत प्रलंबित कामकाजाचा १०० टक्के निपटारा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असा आदेश राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिले होते मात्र या परिपत्रकास दौंड मध्ये तालुका कृषी अधिकारी केराची टोपली दाखवली असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे त्यामुळे संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की कृषीमंत्री यांनी राज्यात दिनांक ०७ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या
कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांच्या भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे (Land Seeding), ई-केवायसी (e-KYC) व बैंक खाते आधार संलग्न (NPCI Seeding) करणे या बाबीची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिलेले होते. तसा शासन निर्णय संबंधित कार्यालयाकडून त्यांच्या सर्व शाखांना देण्यात आला होता. मात्र दौंड मध्ये नोडल अधिकारी म्हणून नियुक्त असलेले तालुका कृषी अधिकारी यांनी अद्याप या बाबत गंभीर दखल घेतलेली नाही. शेतकरी याबाबत विचारणा करण्यास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात गेले असता हे काम महसूल विभागाचे असल्याचे कृषी विभागातील अधिकारी सांगत आहेत, तर महसूल विभाग दौंड यांनी संबंधित काम हे कृषी विभागाकडे वर्ग झाले असल्याचा तहसील कार्यालय मध्ये फलक लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दौंड तालुक्यांमध्ये सध्या पर्जन्यमान हे अत्यल्प असून अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे श्रोत थांबले आहेत. त्यातच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी मिळत नसल्याने शेतकरयांवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दुष्काळात तेरावा महिना आणल्याचे चित्र निर्माण होत आहे…
शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे, वरिष्ठांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती मागणी शेतकरी करीत आहेत.
जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी पुणे तसेच माननीय मुख्य सचिव कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तातडीने संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी व वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत…

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लॉगिन आयडी पासवर्ड अद्याप मिळालेला नाही अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी दिली… तसेच इ केवायसी चे काम कृषी सहायक करीत असल्याचे सांगितले..

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]