ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौंड तालुक्यातील महामार्गावरील समस्या व रस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी, आमदार कुल यांची माहिती…

केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेतली यावेळी NH-9 पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली तसेच दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा अशी मागणी केली , प्रसंगी खालील प्रमुख मागण्या केल्या –

???? पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत उन्नत महामार्ग (Elevated Highway ) उभारण्या संदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.

???? पुणे सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस , मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठीक ठिकाणी सर्व्हिस रोड चे काम करणेबाबत आपल्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व वरील सर्व्हिस रोडची कामे सुरु करण्यात यावीत.

????रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी तसेच कुरकुंभ येथील धोक्याची व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करून त्यावर कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्ताव तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी.

????NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे.

???? NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा.

???? केंद्रीय रस्ते निधी द्वारे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर खोरोडी येथे RUB (रेल्वे अंडर ब्रिज) उभारण्यात यावा.

यावेळी यावेळी माझे सहकारी मित्र माढा लोकसभेचे खासदार मा. श्री. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार मा. श्री. जयकुमार भाऊ गोरे उपस्थित होते, माननीय गडकरी साहेबांनी आपल्या सर्व मागण्यांबाबत दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]